Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

देवगड ; ‘Y’ जंक्शनचा होणार कायापालट; पालकमंत्री नितेश राणे दिला ८५ लाखांचा निधी

देवगड ;  ‘Y’ जंक्शनचा होणार कायापालट; पालकमंत्री नितेश राणे  दिला ८५ लाखांचा निधी


८५ लाखांच्या निधीतून साकारले जाणार आकर्षक सर्कल; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास

कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट



देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरण साठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवगड एसटी बसस्थानकाच्या कोपऱ्याची शासनाच्या ताब्यात असलेली जागा उपलब्ध करून या ठिकाणी आकर्षक सर्कल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध संस्था, संघटना आणि व्यापारी संस्थांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीची दखल घेत हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
हा निधी सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून देण्यात आला असून, सर्कलच्या निर्मितीमुळे या परिसराचे स्वरूप बदलण्यासोबतच वाहतुकीच्या दृष्टीनेही सुविधा निर्माण होणार आहे.

देवगड-निपाणी मार्गाच्या विकासाला मिळणार जोड


देवगड-निपाणी रस्त्याच्या विकासाचे काम सुरू असताना Y जंक्शनचे सुशोभीकरण होणे महत्त्वाचे मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सर्कल उभारण्याची मागणी विविध संस्था, संघटना आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात येत होती. या मागणीची पूर्तता झाल्याने परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. Y जंक्शनमधून जाणारा एक प्रमुख मार्ग देवगड-निपाणी रस्त्याला जोडतो, तर दुसरा महत्त्वाचा मार्ग कुणकेश्वरच्या दिशेने जातो. याच मार्गावर देवगडची पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन असल्याने या मार्गावर पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे या महत्त्वाच्या ठिकाणी सुसज्ज आणि सुशोभित सर्कलची आवश्यकता होती.

देवगडची ओळख सांगणारा स्टॅच्यू ठरणार आकर्षण


प्रस्तावित सर्कलमध्ये देवगडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख सांगणारा स्टॅच्यू उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसोबतच या सर्कलला पर्यटन आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. देवगडमध्ये किल्ला, समुद्रकिनारा, पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन यांसारखी पर्यटनस्थळे असून, Y जंक्शन हे या पर्यटन मार्गावरील महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरते. त्यामुळे या ठिकाणी होणारे सुशोभीकरण देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. या विकासकामामुळे देवगड शहरातील महत्त्वाच्या चौकाचे रूप पालटणार असून, नागरिक तसेच व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ruchira top