Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

ओरोस क्रीडा संकुलातील जुन्या जलतरण तलावाला मिळणार नवा चेहरा!

ओरोस क्रीडा संकुलातील जुन्या जलतरण तलावाला मिळणार नवा चेहरा!



पालकमंत्री नितेश राणे यांनी जलतरणपटूंच्या सरावाला दिले महत्व

७५ लाखांच्या निधीतून सिंधुदुर्गनगरीचा जलतरण तलाव कात टाकणार


सिंधुदुर्गनगरी |प्रतिनिधी: 
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी घडामोड आता प्रत्यक्षात येत आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शासकीय जलतरण तलावाच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यावर्षी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करणाऱ्या जलतरणपटूंना दिलासा मिळाला असून, तलावाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळत आहे.

सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून, त्याच परिसरातील क्रीडा संकुलाने जिल्ह्यातील विविध खेळांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर क्रीडा संकुले विकसित करण्याची सुधारित योजना २६ मार्च २००३ रोजीच्या शासन निर्णयाने कार्यान्वित झाली. या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना त्यांच्या जिल्ह्यातच सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा संकुल उभे राहिल्यानंतर जिल्ह्यातील विविध खेळांना व्यासपीठ मिळाले. मैदानी खेळांसोबतच बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट तसेच जलतरणासारख्या खेळांसाठी खेळाडूंना सरावाची संधी उपलब्ध झाली. या ठिकाणी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंनी या तलावाचा वापर केला केला जात होता. परंतु तो नादुरुस्त झाल्यामुळे येथील जलतरणपटू पुढे सरावाचा प्रश्न निर्माण झाला होता. आजही या तलावात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन केले जाते. सप्टेंबर २०२६ मध्ये ओरोस येथील याच क्रीडा संकुलातील जलतरण तलावात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती.
वाढत्या वापरामुळे जलतरण तलावाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत गेला. २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या तलावाची पाहणी करून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी तलावातील फरशा, दरवाजे, शॉवर, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, रंगरंगोटी तसेच पाण्याच्या स्वच्छतेसंबंधी कामांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती.

त्यानंतरच्या काळातही तलावातील विविध तांत्रिक समस्या कायम राहिल्या. तुटलेल्या टाइल्स, बाल्कनीच्या स्लॅबला पडलेले तडे आणि अपुऱ्या क्षमतेच्या फिल्टरेशन प्लांटमुळे जलतरणपटूंच्या सरावावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. जलतरण करणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
या भागाचे आमदार निलेश राणे यांनी क्रीडा संकुलातील प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. जलतरणपटू आणि पालकांनी या समस्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जुलै २०२६ मध्ये सिंधुदुर्गनगरीतील शासकीय जलतरण तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जलतरण प्रशिक्षक, पालक आणि जलतरणपटू उपस्थित होते.तलावाची केवळ वरवरची डागडुजी न करता त्याचे व्यापक नूतनीकरण करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडविण्याच्या उद्देशाने सुसज्ज सुविधा निर्माण करण्याचा प्रस्तावही पुढे आला. यातून नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. त्यामुळे तलावातील मूलभूत सुविधांपासून पाणी शुद्धीकरण, सुरक्षितता, परिसराची देखभाल आणि खेळाडूंना आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.

या जलतरण तलावाचे नूतनीकरण हे केवळ एका क्रीडा सुविधेचे काम न राहता सिंधुदुर्गच्या क्रीडा पायाभूत सुविधांना नवी दिशा देणाऱ्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जुन्या तलावाला नवा चेहरा मिळाल्यानंतर जलतरणपटूंना सुरक्षित आणि दर्जेदार सरावाची सुविधा उपलब्ध होईल. परिणामी जिल्ह्यातील नव्या पिढीतील जलतरणपटूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी अधिक चांगले व्यासपीठ पुन्हा निर्माण होत आहे.
त्यामुळे, जुन्या आठवणी जपणारा हा जलतरण तलाव आता नव्या रूपात सज्ज होणार असल्याने सिंधुदुर्गनगरीतील जलतरणपटू आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद खुलला आहे.


"पूर्वा गावडे" ही राष्ट्रीय जलतरणपटू या तलावात घडली !

सिंधुदुर्गच्या जलतरण क्षेत्रासाठी हा तलाव केवळ पोहण्याची सुविधा नसून अनेक खेळाडूंच्या स्वप्नांचा सरावमंच आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील मुलांना महागड्या खासगी सुविधांवर अवलंबून न राहता शासकीय क्रीडा सुविधेत सराव करण्याची संधी या तलावामुळे मिळते. याच तलावातून सराव करून जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध स्तरांवर आपली कामगिरी नोंदवली आहे. सिंधुदुर्गच्या पूर्वा गावडे हिने जलतरणात जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जलतरणासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याची गरज अधोरेखित होते.

ruchira top