Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भजनांचा जागर : नवरात्रोत्सवानिमित्त मालवणात आयोजन

भजनांचा जागर : नवरात्रोत्सवानिमित्त मालवणात आयोजन


श्री भैरवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरला भजन महोत्सव

मंगेश नलावडे |मालवण  : नवरात्रोत्सवानिमित्त मालवण शहरातील श्री देवी भैरवी मंदिर, संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथे यंदाही पारंपरिक भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भजन महोत्सव यंदा १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता विविध भजन मंडळांच्या सहभागातून हा भजन महोत्सव पार पडणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तिमय वातावरण निर्मिती करण्याबरोबरच मालवणातील पारंपरिक भजन संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


११ ऑक्टोबर रोजी श्री अंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले, १२ रोजी श्री ब्राह्मणदेव प्रसन्न भजन मंडळ, कांदळगाव-कातवड, १३ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ,कांदळगाव-कातवड, १४ रोजी देवकी माता प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे, तर १५ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव-कातवड यांची भजने होणार आहेत. १६ ऑक्टोबर रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ, १७ रोजी आई तुळजाभवानी ढोलकी भजन मंडळ, वायरी मालवण, १८ रोजी बाल दांडेश्वर भजन मंडळ, दांडी मालवण, १९ रोजी श्री देवी घुमडाई सातेरी प्रासादिक भजन मंडळ, घुमडे आणि २० ऑक्टोबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ, मालवण यांचा सहभाग राहणार आहे.

या भजन महोत्सवाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा संगम अनुभवता येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top