Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

अनुभव शिक्षा केंद्रामार्फत नेतृत्व कार्यशाळेला सेवांगण, मालवण येथे सुरुवात..

अनुभव शिक्षा केंद्रामार्फत नेतृत्व कार्यशाळेला सेवांगण, मालवण येथे सुरुवात..

मालवण : युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता निर्माण करणे तसेच लोकशाही मूल्ये, संविधान आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने अनुभव शिक्षा केंद्रामार्फत दिनांक २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नेतृत्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेची सुरुवात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, समता, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांपासून प्रेरणा घेत युवकांनी समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.

या नेतृत्व कार्यशाळेमध्ये धुळे, नाशिक, लातूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील युवक-युवती सहभागी झाले आहेत. विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांना एकत्र आणून त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण, संवाद आणि सामूहिक शिकण्याची संधी या कार्यशाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कार्यशाळेच्या माध्यमातून युवकांमध्ये नेतृत्व क्षमता, संवादकौशल्य, संघभावना, निर्णयक्षमता, चिकित्सक विचार, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच युवकांनी आपल्या परिसरातील सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सामूहिक पद्धतीने काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि दृष्टिकोन विकसित करावेत, यासाठी विविध सत्रे, समूहचर्चा, कृतीआधारित उपक्रम आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, विभागीय समन्वयक दीपक देवरे, जिल्हा प्रशिक्षक महादेव कोटे, जितेंद्र राठोड, प्रदीप राठोड, सहदेव पाटकर, प्रकाश राठोड यांची उपस्थिती होती.

विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या युवक-युवतींना एकमेकांच्या सामाजिक आणि स्थानिक अनुभवांमधून शिकता यावे, तसेच पुढील काळात आपल्या गावात, परिसरात आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी नेतृत्वाची भूमिका घेता यावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.

“युवकांनी केवळ बदलाची वाट पाहू नये, तर स्वतः परिवर्तनाचे नेतृत्व करावे,” या भूमिकेतून अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून अशा नेतृत्व विकासाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सेवांगणच्या प्रेरणादायी वातावरणात सुरू झालेली ही तीन दिवसीय कार्यशाळा युवकांच्या विचारांना, अनुभवांना आणि नेतृत्वाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

ruchira top