४ ऑक्टोबर रोजी हळवल कणकवली येथे आयोजन
कणकवली : निलायम कृष्णकक्ष, हळवल-कणकवली येथे रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा सुप्रसिद्ध अभिवाचन अनुभव कार्यक्रम रंगणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रसिकांना साहित्य, अभिनय आणि संगीताचा अनोखा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांनी केले असून, कार्यक्रमात विविध भूमिकांमधून अनुभवी कलाकार सहभागी होणार आहेत. आजीच्या भूमिकेत वैशाली पंडित, आजोबांच्या भूमिकेत संजय शिंदे, सूत्रधार म्हणून अक्षय सातार्डेकर, सहकलाकार म्हणून डॉ. सुमेधा नाईक यांचा सहभाग आहे. तसेच तालवाद्यावर वैभव मांजरेकर साथ देणार आहेत.
‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ निर्मिती व प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमातून अभिवाचन, अभिनय आणि तालवाद्य यांची सुंदर सांगड घालत रसिकांना वेगळा सांस्कृतिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या डॉ. वैशाली कोरगांवकर व गीता कामत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेशिका ₹१०० असून अधिक माहितीसाठी ९४२२०४३०२५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

उत्तरचंद्राची कोजागिरी....
