कणकवली | प्रतिनिधी: गांधी जयंती चे औचित्य साधून गोपुरी आश्रम आणि अनुभव शिक्षा केंद्र आयोजित वाचन संस्कृती उपक्रमाचे दुसरे सत्र गोपुरी आश्रम वागदे येथे पार पडणार आहे.
यामध्ये "१)गांधीजींच्या पुस्तकांतून उलगडणारे जीवन, विचार आणि कार्य, २) जेन - झीनच्या नजरेतील गांधीजी, ३) सद्यस्थितीतील आंदोलनांमागील गांधींच्या अहिंसावादी सत्याग्रहांची प्रेरणा" ह्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बोलण्याची वेळ ५ ते ७ मिनिटे असेल. स्पर्धेसाठी नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणीच सकाळी १० वाजेपर्यंत करायची आहे. ही स्पर्धा वय वर्ष १५ ते २५ साठी मर्यादित असेल. पुस्तक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र पहिल्या तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना देण्यात येईल. सहभागींना प्रमाणपत्र मिळेल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा तसेच वाचन संस्कृतीच्या सत्रामध्ये ही वाचन प्रेमींनी उपस्थिती नोंदवावी असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कणकवली गोपुरी आश्रम येथे ४ ऑक्टोबर रोजी वक्तृत्व स्पर्धा..
