Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला..

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी  ‘लव्ह जिहाद’चा डाव  उधळला..

अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा केला होता प्रयत्न

राणेंच्या जिल्ह्यात "लव्ह जिहाद" खपवून घेणार नाही

कणकवली भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा

कणकवली :
अल्पवयीन हिंदू धर्मीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह करण्याचा मुस्लिम युवकाचा लव्ह जिहादचा प्रयत्न भाजपा पदाधिकात्यांनी कणकवलीत हाणून पाडला. त्या मेहबूब जैनुद्दीन लदाफ (वय २७) या मुस्लिम युवकाने तिला प्रेमाच्या मोहात पाडून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. ती अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी लग्नाबाबत जिल्हा निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहीती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे सदर युवतीच्या कुटुंबियांनी तक्रार केली. त्यानुसार सदर विवाह लव्ह जिहादचा प्रकार असल्याने तो उधळल्याची माहीती कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक राकेश राणे यांनी दिली. तर राणेंच्या जिल्हा असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक स्वप्नील राणे,मेघा सावंत, मनस्वी मिथुन ठाणेकर, आर्या औदुंबर राणे, प्रतिक्षा सावंत, महेश सावंत, औदुंबर राणे उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे हिंदू समाज रक्षणासाठी राज्यभर काम करत आहेत. हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर ते आवाज उठवत आहेत. कणकवलीतील हा लव्ह जिहादचा प्रकार आमच्याकडे पीडित युवतीच्या कुटुंबियांनी सांगितला. विवाहासाठी मुस्लिम तरुण मेहबूब जैनुद्दीन लदाफ याने जिल्हा निबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र या विवाहास सदर हिंदू युवतीचा विरोध होता. तरी देखील जबरदस्तीपणे हा विवाह करण्याचा मेहबुबचा प्रयत्न सुरु होता. त्या युवतीच्या कुटुंबियांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातुन आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारातील मुस्लिम तरुणाला योग्य त्या पद्धतीने समज दिल्यानंतर त्याने जिल्हा निबंधक कार्यालयाकडे दिलेला अर्ज मागे घेतला.आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असे लेखी दिले. लव्ह जिहादच्या प्रकारात अडकलेल्या त्या युवतीला बाहेर काढण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढील काळात हिंदू युवतींना जर कोण मुस्लिम समाजातील तरुण फसवत असेल तर भाजपा गप्प बसणार नसल्याचा इशारा नगरसेवक राकेश राणे यांनी दिला आहे..

ruchira top