Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

आमदार निलेश राणे यांनी केली वराड तलावाची पाहाणी

आमदार निलेश राणे यांनी केली वराड तलावाची पाहाणी


तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करा

गाळ उपसा व अन्य उपाययोजना दृष्टीने अहवाल तयार करण्याचे प्रशासनास निर्देश


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड तलाव परिसराची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. तलावाची सध्याची स्थिती आणि उपलब्ध पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर तलावातील गाळ उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह आवश्यक त्या दुरुस्तीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले.
वराड तलाव परिसराची पाहणी करताना तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गाळ साचल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी गळती व अन्य कारणाणी उपलब्ध क्षमतेचा पूर्णपणे वापर होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात गाळ उपसा, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक उपाययोजना करून तलावाची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या.
तालुक्यातील जलस्रोत अधिक सक्षम करण्याबरोबरच पाणी पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर आमदार निलेश राणे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उपलब्ध जलस्रोतांचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top