Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

रोझरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मालवणात स्वच्छता अभियान

रोझरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मालवणात स्वच्छता अभियान


महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम ; पथनाट्यातूनही दिला स्वच्छतेचा संदेश

मालवण | प्रतिनिधी :
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सार्वजनिक परिसराची स्वच्छता केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक ग्रेमा फर्नांडिस,आनंदी बंदिवाडेकर, व जीवितेश लोकेगावकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी स्वच्छता राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आठवीच्या दुसऱ्या गटाने फोकंडा पिंपळ परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी शिक्षक स्वप्निल तांबे व शिक्षिका आनंदी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या.

दरम्यान, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बंदर जेटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली. या उपक्रमात शिक्षिका स्वाती हळदणकर, मृदुला केणी व सोनाली फाटक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानादरम्यान ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. केवळ स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणेही आपलीच जबाबदारी आहेत, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या कृतीतून अधोरेखित झाली.
शाळेचे मुख्याध्यापक फादर एंथनी डिसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि सार्वजनिक ठिकाणांच्या संवर्धनाची जबाबदारी यांची जाणीव अधिक दृढ झाली. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाला कृतीची जोड देत रोझरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top