Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संशयित सचिन साबळेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संशयित सचिन साबळेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला


मालवण | प्रतिनिधी : कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणातील संशयित सहआरोपी सचिन साबळे याचा जामीन अर्ज मा. न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणात १६ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली.

संशयित आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना, त्याच्याविरुद्ध सध्या ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचा तसेच आरोपी संस्थेत संचालक/प्रवर्तक म्हणून कार्यरत असला, तरी त्याचा सदर गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच त्याला या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचेही आरोपीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मांडलेल्या ‘जामीन हा नियम आणि तुरुंग हा अपवाद’ या न्यायिक तत्त्वाचा संदर्भ देताना, संशयित आरोपी साबळे हा तथाकथित विवादित बँकेचा प्रवर्तक असल्याचा ठोस कागदोपत्री पुरावा न्यायालयात देण्यात आला व सदरचा कागदोपत्री पुरावा हा आरोपीचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध करण्यास पुरेसा असून बनावट बँक स्थापन करण्यामध्ये या आरोपीचा देखील सहभाग असल्याचा युक्तिवाद हा फिर्यादी आणि १६ पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. श्रीराम चिंदरकर यांनी केला.

सदर कर्ज प्रकरणे करताना फिर्यादी तसेच इतर पीडित व्यक्तींची कर्ज मंजूर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे/ॲग्रीमेंट याच आरोपीने केले असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आरोपीचा गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग व गुन्ह्याचे गांभीर्य, आर्थिक फसवणुकीची व्याप्ती, पीडितांची संख्या तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता, हे प्रकरण सर्वसाधारण नियमातील अपवादाच्या कक्षेत येते, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच आरोपीला जामीन मिळाल्यास त्याच्याकडून पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे केले जाण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

संशयित आरोपीला या टप्प्यावर जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, तपासावर परिणाम करू शकतो किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद ॲड. चिंदरकर यांनी केला. त्यामुळे आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला जामीन देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी न्यायालयासमोर मांडली.

या सर्व बाबींचा विचार करून मा. न्यायालयाने सहआरोपी सचिन साबळे याचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला. या निर्णयामुळे फसवणुकीचे आरोप असलेल्या प्रकरणातील फिर्यादी आणि १६ पीडित गुंतवणूकदारांच्या न्यायालयीन लढ्याला महत्त्वाचे यश मिळाले असून, संशयित आरोपीविरुद्धचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे.

ruchira top