Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे यांची तत्परता !

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे यांची तत्परता !

दुष्काळाचे चटके अन चिंतेतील शेतकऱ्यांसाठी राणे परिवाराची खंबीरता

“एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये”

सरसकट पंचनाम्यांचे प्रशासनास देण्यात आले निर्देश

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून व्यथा जाणून आ. निलेश राणे साधत आहेत संवाद

संकट काळात महायुती सरकार खंबीरपणे सोबत असल्याचा विश्वास


मालवण :
पावसाचा प्रदीर्घ खंड आणि दुष्काळस्थिती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र जिथे प्रश्न गंभीर तिथे आमदार निलेश राणे खंबीर हे चित्र नेहमीच दिसून येते. एकूणच राणे परिवार आणि कोकण हे अतूट नाते या संकट काळात मदतीच्या रूपातून नेहमीच दिसून येते. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे कोकण हे आपले कुटुंब मानतात. जनतेच्या प्रत्येक सुख दुःखात आपलेपणाने सहभागी होतात. आताही दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बळीराजाच्या अर्थात शेतकऱ्यांच्या पाठीशी राणे परिवार खंबीरपणे सोबत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचा विश्वास देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहता नये. शेत पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. माझ्या शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने कार्यरत आहेत. कुडाळ मालवण तालुक्यातील अनेक गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा समस्या जाणून घेत आहेत. संकट काळात सोबत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना देत आहेत.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे कोकणातील पाणीदार अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही यंदा दुष्काळाच्या सावटाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील या स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 265 तालुक्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सह सर्व आठही तालुक्यांमध्ये दुष्काळाची ‘प्रथम कळ’ अर्थात Trigger-1 लागू केल्याने यंदाची परिस्थिती विशेष गंभीर ठरली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. जी काही मदत असेल ती मिळेलच. मात्र माझ्या शेतकरी कुटुंबाचे झालेले नुकसान मोठे आहे. त्याला सर्वतोपरी मदत मिळालीच पाहिजे. नुकसानीचे पंचनामे सरसकट झाले पाहिजेत. पंचनामाची प्रक्रिया 5 ऑक्टोबर पर्यत पूर्ण झालीच पाहिजे. असे निर्देश महसूल कृषी व पंचायत समिती प्रशासनास देताना आमदार निलेश राणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणाचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गतिमान रित्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. महसूल, कृषी, पंचायत समिती प्रशासन यांच्या माध्यमातून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामे सुरु आहेत. थेट बँक खात्यात मदतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक डिटेल, सातबारा, आठ अ तसेच अर्ज पूर्तता करावी. असेही आवाहन यां निमित्ताने तहसील व कृषी प्रशासनाने केले आहे. फार्मर आयडी, पीक पाणी बंधनकारक नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

शेताकऱ्यांचे मोठे नुकसान
कुडाळ मालवण तालुक्यातील विविध भागांत आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भातपिकाची पाहणी केली. पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या मात्र तरवा लावण्यासाठी पुरेसा पाऊस झाला नाही. अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली. बहुतांश ठिकाणी उभे पीक करपल्याचे विदारक चित्र शेतकऱ्यांवरील संकटाची तीव्रता स्पष्ट करणारी ठरली आहे.

भातशेतीवर मोठा परिणाम

मालवण कुडाळ तालुक्याच्या विचार करता गेल्या काही वर्षातील आकडेवारीनुसार सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. याशिवाय काही ठिकाणी भुईमूग, नाचणी यांसारखी पिकेही घेतली जातात. पावसाचा प्रदीर्घ खंड व या अनुषंगाने निर्माण झालेल्या पाण्याअभावी सर्वच शेतीवर मोठा आणि गंभीर परिणाम झाला. पिकाच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यावर पाऊस नसल्यामुळे जमिनी सुकून गेल्या. पीक जळाले. शेतकऱ्यांसमोर गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

आमदार निलेश राणे यांची महत्वाची भूमिका
दुष्काळ स्थिती, प्रशासकीय पंचनामे या संपूर्ण प्रक्रियेत मालवण कुडाळच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावावात प्रत्यक्ष पाहाणी, सातत्याने अधिकाऱ्यांना सोबत बैठाका घेऊन घेतला जाणारा आढावा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे यांची असलेली तत्परता जनतेप्रती समर्पण भावनेतून असलेले कार्य सिद्ध करणारी ठरत आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top