Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म


वेंगुर्ला तुळस मधील सर्पमित्र महेश राऊळ यांची चौथ्या वेळी यशस्वी कामगिरी

तुळस, वेंगुर्ला: - वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून 10 पिलांना जन्म देण्यात सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांना यश आले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने त्यांची ही चौथी यशस्वी कामगिरी आहे.

तुळस येथील राजू परुळकर यांच्या घराच्या कामासाठी ठेवलेल्या वाळू मधून बाहेर आलेली सुमारे १४ अंडी आढळून आली होती. उन्ह, मुंग्या आणि इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे ती नष्ट होण्याची शक्यता होती. परूळकर यांनी महेश राऊळ यांना फोन करून याची माहिती दिल्यावर सर्पमित्र महेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व अंडी अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित स्थळी हलवली.
त्यांनी घरातच ओलसर माती व नारळाच्या भुशाचा वापर करून निसर्गसदृश उबवण केंद्र तयार केले. सुमारे 20 दिवस अचूक तापमान व आर्द्रतेची काळजी घेतल्यानंतर या अंड्यांमधून 10 निरोगी पिलांचा जन्म झाला. सर्व पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

उल्लेखनीय आहे की, यापूर्वीही महेश राऊळ यांनी तेल सरडा (Skink) आणि गार्डन लिझार्ड अशा दोन प्रकारच्या सरड्यांची अंडी तीन वेळा यशस्वीरित्या उबवून सरड्यांच्या पिलांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे वन्यजीव संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

"सापांप्रमाणेच सरडे देखील शेतकऱ्यांचे मित्र आहेत. ते कीटकांवर नियंत्रण ठेवतात. प्रत्येक अंड्यामागे एक जीव असतो, तो वाचवणे हे आपले कर्तव्य आहे," या सृष्टीतील प्रत्येक सजीवांना जगण्याचा अधिकार आहे..जगवा आणि जगा याचं माणसाने तंतोतंत पालन केले पाहिजे.. जिवश्रुष्टि टिकली तरच आपण टिकणार आहोत...असे महेश राऊळ यांनी सांगितले.

ruchira top