Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

भाजपा ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला बंधारा

वेंगुर्ला | प्रतिनिधी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याच्या उद्देशाने आसोली-रांजणवाडी येथील वहाळावर भाजपचे ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे स्थानिक पातळीवर राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी एकत्र येऊन वहाळावर बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासह परिसरात जलसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

वहाळातील पाणी अडविल्यामुळे परिसरातील विहिरी व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन जलसंधारणाचे काम हाती घेतल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यातही गावातील विविध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, या.का.का. सदस्य गुरुनाथ घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .

ruchira top