Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचे चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचे चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आणि वनशक्ती, इंडिया यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात महाविद्यालयातील ३३ NSS स्वयंसेवक व ६ प्राध्यापक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास राबते आणि NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी चिवला समुद्रकिनारा व परिसरातील प्लास्टिक कचरा तसेच इतर घनकचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच सागरी व किनारी परिसंस्थेचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक समुदायामध्ये जनजागृती करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. स्वयंसेवकांनी सामूहिक सहभागातून स्वच्छता राखण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे NSS स्वयंसेवकांना पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच किनारी परिसराचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत व पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची प्रेरणा स्वयंसेवकांना मिळाली.
यावेळी डॉ. हंबीरराव चौगले यांनी विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व व त्याच्या योग्य पद्धतीची माहिती दिली. डॉ. संकेत बेळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, सोहम भोगले, मयुरेश कदम, क्रांती पालव आणि वैभवी गावडे या संयोजन समितीने परिश्रम घेतले.

ruchira top