Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

लायन्स क्लब मालवणचा सेवाभावी उपक्रम

लायन्स क्लबच्या उपक्रमास भाविकांकडून प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मालवण बंदर जेटी येथे गणेश विसर्जनावेळी निर्माल्य संकलनाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. गणेशभक्तांकडून फुले, हार, फुलपत्री आदी निर्माल्य श्रद्धेने स्वीकारून ते मालवण नगरपालिकेच्या निर्माल्य कलश माध्यमातून पुढील प्रक्रियेसाठी जमा करण्यात आले. लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या मार्गदर्शनात विविध यशस्वी उपक्रमा सोबत हा ही उपक्रम उपस्थित सर्व पदाधिकारी सदस्य यांनी यशस्वी राबवला.
गणेशोत्सव काळात अनंतचतुर्दशी पर्यंत लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मालवण बंदर जेटी येथे उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून त्यांनी निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित केले. त्यामुळे विसर्जनस्थळी निर्माल्याचा कचरा होण्यास प्रतिबंध करण्यासोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यास हातभार लागला.

गणेशभक्तांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पूजेमध्ये वापरलेले फुले, हार व फुलपत्री लायन्स क्लबच्या सदस्यांकडे सुपूर्द केली. संकलित करण्यात आलेले निर्माल्य मालवण नगरपालिकेच्या निर्माल्य कलशामध्ये जमा करण्यात आले.

गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव असतानाच पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीही प्रत्येकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ मालवण पदाधिकारी सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब मालवणच्या खजिनदार सौ. राधिका मोंडकर, सदस्य सौ. जयश्री हडकर, मुकेश बावकर, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, गणेश प्रभूलकर, मनाली दळवी आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top