Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम

सिंधुदुर्गातील गणेशोत्सवा दरम्यान निर्माल्य संकलनातून होणार कंपोस्ट खतनिर्मिती


मालवण |प्रतिनिधी :
नेहमीच सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम प्रभावीपणे राबवणाऱ्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा जि. रायगड यांच्या वतीने यंदाही पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश कृतीतून देण्यात आला आहे. गणेशोत्सवात गोळा झालेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणपूरक कंपोस्ट खत निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या, अकराव्या तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ श्रीबैठकांतील २४० श्रीसदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे ९ टन ७८० किलो निर्माल्य संकलित करून खत निर्मितीसाठी व्यवस्थापन केले.
गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर नद्या, तलाव व समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य पाण्याच्या स्रोतांमध्ये विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते व दुर्गंधी सुटते. यावर पर्यावरणपूरक व प्रभावी उपाययोजना म्हणून प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांच्या व स्थानिक प्रशासनाच्या सहभागातून संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून हे निर्माल्य गोळा करण्यात आले.

गोळा केलेल्या निर्माल्यातील प्लास्टिक, हार-धागे वेगळे करून केवळ नैसर्गिक फुले-पानांचा वापर खत निर्मितीसाठी केला गेला आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर केले जाईल. यातून निर्मिती झालेले खत हे प्रतिष्ठानमार्फत लागवड केलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांसाठी वापरले जाते. संवर्धन केलेले वृक्ष उत्तम प्रकारे वाढ झाल्यानंतर त्याचे शासनाकडे हस्तांतरण केले जाते.
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. निर्माल्यापासून खतनिर्मिती हादेखील याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग आहे.

या प्रकारच्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावरील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी झाला असून, समुद्र, नद्या, तलाव यांसारख्या जलस्रोतांचे जलप्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. याप्रसंगी मालवण जेटी-बंदर येथे नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक शेलार यांनी भेट दिली.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top