Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दांडी बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम..

दांडी बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम..

महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकारातुन किनारा चकाचक

मंगेश नलावडे | मालवण :
दांडी बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आल्याने स्थानिक मच्छिमार तसेच पर्यटकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. किनाऱ्यावर आलेल्या या कचऱ्यामुळे मासेमारीच्या कामात अडथळे निर्माण होत होते, तर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दांडी बीचचे सौंदर्यही झाकोळले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तसेच २७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक पर्यटन दिना’चे औचित्य साधून महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुढाकार घेत नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम राबविली.
सकाळच्या सत्रात स्थानिक मच्छिमार नेहमीप्रमाणे बोटी घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेले असता कचरा त्यांच्या जाळ्यांमध्ये अडकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मच्छिमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचबरोबर पर्यटन हंगाम सुरू असल्याने दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. किनाऱ्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे पर्यटकांच्या अनुभवावर परिणाम होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेऊन अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने पालिका प्रशासनाशी संपर्क साधत स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दांडेश्वर मंदिर परिसर ते दांडी आवार या संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची विशेष स्वच्छता करण्यात आली. किनाऱ्यावर साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी अन्वेषा आचरेकर यांनी सांगितले की, “दांडी किनारा हा मालवणमधील प्रमुख आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला परिसर आहे. तसेच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे हे मुख्य केंद्र आहे. जमा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छिमारांना काम करणे कठीण जात होते आणि पर्यटकांच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आम्ही ही मोहीम तातडीने राबवली आहे. पर्यटन वृद्धीसोबतच किनाऱ्याचे पर्यावरण टिकवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”

२७ सप्टेंबर रोजी जगभरात ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा केला जातो. मालवण हे कोकणातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर दांडी बीचवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे स्थानिक मच्छिमार, नागरिक आणि पर्यटकांनी स्वागत केले.

मच्छिमारांची निर्माण झालेली अडचण दूर करण्यासोबतच पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल स्थानिक मच्छिमार, नागरिक आणि पर्यटकांनी महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर तसेच नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

ruchira top