Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

पालकमंत्री नितेश राणे रविवार २७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

पालकमंत्री नितेश राणे रविवार २७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार

शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष करणार पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक

कणकवली :
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील भात शेतीच्या परिस्थितीची तसेच नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे. तर जिल्हाधिकारी आणि सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

पालकमंत्री नितेश राणे रविवारी २७ रोजी सकाळी ९ वाजता मोपा, गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोटारीने सिंधुदुर्गकडे रवाना होतील. सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे भात शेतीच्या पिकांच्या परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे पाहणी होणार आहे.
दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामाचा आढावा घेतील.

यानंतर दुपारी ३.३० वाजता कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे भातशेतीच्या पिकांची पाहणी केली जाईल. सायंकाळी ४.३० वाजता देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे - तांबळवाडी येथे भातशेतीची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे पाहणी दौरा होणार आहे.

या दौऱ्यात पालकमंत्री राणे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेणार असून, संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होणार आहे.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ruchira top