Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

करंजा बंदराच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

करंजा बंदराच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे स्थानिक मच्छिमारांनी करंजा बंदराच्या विकासाची केली होती मागणी

प्रमुख २१ विकासकामे लागणार मार्गी

बंदर प्रवेश मार्गावरील गाळ उपसा ,धक्काभिंत,काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र अशा छोट्या मोठ्या संख्य कामांचा आहे समावे

हजारो मच्छीमारांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी झाली पुर्ण



उरण : करंजा बंदराच्या विकासासाठी शासनाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. करंजा बंदरातील बोटींच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे, अतिरिक्त रुंदीकरण, ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्का भिंत अशा विविध विकासकामांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. मच्छीमारांना भेडसाविणारी बंदरातील महत्त्वाची गाळाची व अतिरिक्त धक्काभिंतींची समस्या दूर होणार असल्याने रायगडच्या हजारो मच्छीमारांना याचा लाभ होणार आहे.

करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारी हंगामात ५५० कोटी किमतीच्या मासळीची निर्यात होते. मात्र करंजा बंदरात मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे मच्छीमार अडचणीत आले आहेत. गाळामुळे हजारो मच्छीमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरवून पुन्हा जाण्यासाठी बंदरातच चार ते सहा तासांपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळे बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात. त्यामुळे बंदरातील गाळ काढण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून केली जात होती. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा मच्छीमार बंदराच्या विविध प्रकारच्या २१ कामांसाठी खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने ३७० मीटर लांबीची अतिरिक्त धक्काभिंत उभारण्याच्या कामासाठी २६ कोटी ७७ लाख ८८ हजार ६३२ कोटी तर प्रवेश मार्गावरील गाळ व रुंदीकरणाच्या कामासाठी २१ कोटी २५ लाख ४७ हजार ८३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बंदरातील काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र -४, प्रशासकीय भवन, संपर्कासाठी रेडिओ भवन, उपहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाऊंड वॉल,सेव्हरेज ट्रिटमेंट प्लाण्ट, बर्फ फॅक्टरी ,१०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज,सेव्हरेज सिस्टीम, डिझेल पंप आदी विविध प्रकारच्या कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

ruchira top