Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर प्रभाग ९ मध्ये सतर्कता..

डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर प्रभाग ९ मध्ये सतर्कता..

महिला-बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकाराने फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी : आरोग्य विभागाकडूनही खबरदारी व उपाययोजना

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दांडी परिसरात डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुढाकार घेऊन परिसरात तात्काळ फॉगिंग मशीनच्या माध्यमातून डास प्रतीबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे.
दांडी परिसरात गेल्या काही दिवसांत तापाची लक्षणे असलेले आणि डेंग्यूचे निदान झालेले काही रुग्ण सापडून आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सभापती अन्वेषा आचरेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि साथीच्या आजारांचा फैलाव थांबवण्यासाठी दांडी परिसरात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी कीटकनाशक औषध आणि धूर फवारणी करण्यात आली.
यावेळी बोलताना सभापती अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, "नागरिकांचे आरोग्य ही आमची पहिली प्राथमिकता आहे. डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होताच प्रशासनाने व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे." नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, तुटलेली भांडी, आजूबाजूला सोडलेले सांडपाणी किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. काळजी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सोबतच आरोग्य विभागातर्फे प्रभागात घरोघरी जाऊन डासोत्पत्तीची ठिकाणे शोधणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही नागरिकाला तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अंगावर लाल पुरळ यांसारखी लक्षणे दिसून आल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तात्काळ जवळील शासकीय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

ruchira top