ग्रामस्थांनी व्यक्त केले आमदार निलेश राणे यांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : मसुरे गावठणवाडी परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून परिसरात सौर ऊर्जा पथदीप बसविण्यात आला आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असून, ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
परिसरातील नागरिकांनी सौर ऊर्जा पोल बसविण्याची मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल सौर ऊर्जा पोल उपलब्ध करून देण्यात आला. सौर ऊर्जेवर चालणारा हा पोल पर्यावरणपूरक असून, रात्रीच्या वेळी परिसरात आवश्यक प्रकाश उपलब्ध होणार आहे.
या सुविधेमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित तांबे, विलास बागवे, श्रीकांत सावंत, निलेश परब, आनंद तांबे, सिद्धेश बागवे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना, मतदार संघातील विकास कामांसाठी आमदार निलेश राणे तत्पर असतात. आमच्याही मागणीची तात्काळ दखल घेत काम पूर्ण करण्यात आले असे सांगत. नागरिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक आभारही मानण्यात आले.
▪️अमित खोत | मालवण

मसुरे गावठणवाडी येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सौर पथदीप
