Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुणकेश्वरमध्ये ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी होणार..

कुणकेश्वरमध्ये ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी होणार..

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात प्रकल्प करार

५० खोल्यांचे आलिशान हॉटेल २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन

देवगड | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पासंदर्भातील करार आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात करण्यात आला.

कुणकेश्वरच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याला जागतिक दर्जाच्या आतिथ्य सुविधांची जोड देणाऱ्या या प्रकल्पात ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून, हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ‘Tree of Life’ हा IHCL अर्थात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या हॉस्पिटॅलिटी पोर्टफोलिओमधील ब्रँड आहे.

देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना

सिंधुदुर्गातील शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज समूहाशी संबंधित प्रकल्प साकारत असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणखी एक महत्त्वाची दिशा मिळणार आहे. कुणकेश्वरच्या पर्यटन क्षमतेला या प्रकल्पामुळे अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच पर्यटनाशी निगडित हॉटेल व्यवसाय, वाहतूक, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, सेवा आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागून जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही बळकटी मिळू शकते.

कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कुणकेश्वरच्या पर्यटन नकाशावर या प्रकल्पामुळे नव्या सुविधा आणि पर्यटन गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top