Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा; बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा; बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही भागात भातपीक करपण्याच्या घटना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत भातपिकाच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपलब्ध निधीचा प्रभावी व वेळेत विनियोग करण्यासोबतच विकासकामांची गुणवत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, यावरही बैठकीत चर्चा झाली. दर आठवड्याला अमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

ruchira top