Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

उबाठा गटाने मागील दहा वर्षातील स्वतःच्याच नेत्यांचा अपयशी कारभार चव्हाट्यावर आणला!

उबाठा गटाने मागील दहा वर्षातील स्वतःच्याच नेत्यांचा अपयशी कारभार चव्हाट्यावर आणला!

श्रावण गावात लागलेल्या बॅनरवरून शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांचा उबाठा गटाला सणसणीत टोला

मालवण | प्रतिनिधी :
श्रावण गावात लागलेल्या बॅनरवरून शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी उबाठा गटाला सणसणीत टोला लगावला आहे. उबाठा गटाने मागील दहा वर्षातील आपल्याच नेत्यांचा अपयशी कारभार या बॅनर माध्यमातून चव्हाट्यावर आणला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात विनायक बाईत म्हणाले,
2014 पासून मागील दहा वर्षे हा काळ मालवण कुडाळ साठी वनवास ठरला. येथील आमदार, खासदार पूर्णपणे अपयशी ठरले. या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघ विकासात पूर्णपणे मागे गेला. गावागावातील विकास कामे रखडली. सोयी सुविधांपासून जनता वंचित राहिली.

त्यानंतर जनतेने ठाम निर्धार केला. विकासासाठी राणेंशिवाय पर्याय नाही हे जाणून राणे कुटुंबाच्या मागे जनता ठामपणे उभी राहिली. सर्वत्र महायुतीची सत्ता आली.
मालवण कुडाळच्या जनतेने दहा वर्षात अपयशी ठरलेल्या वैभव नाईकना माजी आमदार करून घरी बसवले.

मालवण कुडाळाच्या विकासाचा रथ आमदार निलेश राणे यांच्या हाती दिला. आमदार निलेश राणे जनतेचा विश्वास सार्थ ठरवत आहेत. विकासाचा मोठा बॅकलॉग भरून काढत असताना दीड वर्षात हजार कोटी निधी मालवण कुडाळ मतदार संघात मंजूर करून आणला आहे. प्रत्येक वाडी वस्तीला न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नाशील आहेत. सोबतच विधिमंडळात मालवण कुडाळ चा आवाज दणाणून सोडत आहेत. मालवण कुडाळ ला अधिकचा निधी खेचून आणत आहेत.

आमदार निलेश राणे यांची वाढती लोकप्रियता तसेच त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना मजबूत होत आहे. त्यामुळे उबाठा गट पूर्णपणे अस्तित्वहीन झाला आहे. हातावर मोजण्याइतके जे काही स्वतःला नेते म्हणवणारे उबाठा गटातील काहीजण बॅनर बाजी अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रकार त्यांच्याच अंगलट येत आहेत

श्रावण गावातही उबाठा गटाने असेच काही बॅनर लावले. मात्र त्यांच्या स्वतःच्याच नेत्यांच्या अपयशाचा कारभार यातून चव्हाट्यावर आला आहे. दिलेली आश्वासने कधी पुर्ण झाली नाही. त्यामुळे यापुढे आमच्या गावात मते मागायला येऊ नये. हा गावात लागलेला बॅनर उबाठा गटाच्या माजी आमदार, खासदार यांचे अपयश स्पष्ट करणारा ठरला आहे. उबाठा गटाने हे असले नौटंकी चे प्रकार करत राहावे. आम्ही मात्र जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. असेही विनायक बाईत यांनी सुनावले.

गतिमान व शाश्वत विकासासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध!

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गावासाठी अधिकाधिक निधी विकास कामांच्या स्वरूपात येत असून यापुढेही आणला जाईल. आताही या जिप मतदारसंघात सर्वाधिक निधी श्रावण गावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सुरुवात आहे यापुढे रेकॉर्ड ब्रेक स्वरूपात निधी श्रावण गावासह संपूर्ण मतदारसंघात येईल. जनतेला अपेक्षित असलेली सर्व विकास कामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. असा ठाम विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी व्यक्त केला आहे.

ruchira top