मालवण | प्रतिनिधी : पुढच्या वर्षी लवकर या... च्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत व वाद्यांच्या गजरात मालवण परिसरात गौरी गणपतीना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

गणेश विसर्जन ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने ही विसर्जन मार्गावर बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

मालवण शहरात परिसरातील विसर्जन ठिकाणी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
मालवण शहर देऊळवाडा येथे प्रथेप्रमाणे गांवकर तुळसमांड येथे विसर्जनाला निघणारे सर्व गणपती एकत्र येतात व तिथून विसर्जन मार्गांवर निघतात. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होतो.
▪️गणेश गांवकर, मालवण

