Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

मालवण ग्रामीण रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन साजरा..

मालवण ग्रामीण रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन साजरा..

मालवण | प्रतिनिधी : मालवण ग्रामीण रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत 'पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन' कार्यक्रम पार पडला. आगामी वर्षभर हे अभियान सातत्याने राबविले जाणार असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील, डॉ. प्रशांत बागडे आणि डॉ. नागेश नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी उपक्रमाच्या उद्देशाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन जीवनातील चांगल्या आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अपुऱ्या आहारामुळे बालके व महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानाचा मुख्य गाभा हा गरोदर मातांचे आरोग्य सुधारणे हा आहे. या कार्यक्रमात उपस्थित गरोदर महिलांना आहाराविषयी सखोल समुपदेशन करण्यात आले. गर्भावस्थेत आई आणि बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लोहाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे, खजूर आणि पौष्टिक धान्यांचा आहारात वापर कसा करावा, याची माहिती वैद्यकीय पथकाकडून देण्यात आली.

हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, वर्षभर हे अभियान मालवण तालुका पातळीवर राबवले जाणार आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील महिला, गरोदर माता व बालकांची नियमित ॲनिमिया तपासणी केली जाईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाईल. आवश्यकतेनुसार गरजू महिला आणि बालकांना लोह व फोलिक ॲसिडच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येईल.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे आणि कुपोषण व ॲनिमियासारख्या समस्या मुळापासून नष्ट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top