Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान

स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान

मालवण नगरपरिषदेचा उपक्रम..

राहुल जाधव | मालवण प्रतिनिधी : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान तसेच आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवार १९ सप्टेंबर रोजी चिवला बीच मालवण येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या या अभियानात नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह सदस्य, अधिकारी नागरिकांसह विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी आणि नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “स्वच्छ समुद्रकिनारा — सुंदर मालवण” आणि “स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता हीच जबाबदारी” असा संदेश देत अभियानाची सांगता करण्यात आली.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात नगरपरिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मालवण मत्स्यविभाग कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, मालवण बंदर निरीक्षक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय समुद्र प्रौद्योगीकी संस्थान, श्री. पंचम खेमराज महाविद्यालय (एस.पी.के. महाविद्यालय), सावंतवाडी, येथील शिक्षक व विद्यार्थी, वनशक्ती, यूथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

सर्वांच्या सामूहिक सहभागातून चिवला बीच परिसरातील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिक पिशव्या तसेच इतर घनकचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आला.
या अभियानादरम्यान समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा समुद्रात अथवा समुद्रकिनारी न टाकणे आणि सागरी पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत नागरिक व उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.

स्वच्छ समुद्रकिनारा आणि निरोगी सागरी पर्यावरण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे चिवला बीच येथील स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या संपन्न झाले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top