Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती लक्षात घेऊन सुकळवाड मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती लक्षात घेऊन सुकळवाड मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

ॲड. हेमेंद्र गोवेकर, ॲड. तारीका चिंदरकर-कुबल, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : मारहाणीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातून संशयित आरोपी शांताराम मारुती पाताडे रा. सुकळवाड पाताडेवाडी याची मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२६, ३२४, ३२३,३५२,५०४, आणि ५०६ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली. त्यामुळे संशयितांवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आरोपींतर्फे करण्यात आलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. या खटल्यात संशयित आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हेमेंद्र लक्ष्मण गोवेकर, ॲड. तारीका प्रकाश चिंदरकर-कुबल, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांनी काम पाहिले.

ruchira top