Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

गणेश तोंडवळकर यांचे आदर्शवत सामाजिक कार्य..

गणेश तोंडवळकर यांचे आदर्शवत सामाजिक कार्य..

तोंडवळी मुंजाचे बाग येथे स्वखर्चातून उभारला साकव

साकाव लोकार्पण प्रसंगी प.स. सदस्य गणेश तोंडवळकर यांचा सत्कार करत ग्रामस्थांनी मानले विशेष आभार

मालवण | प्रतिनिधी :
तोंडवळी मुंजाचे बाग येथे ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन सोयीच्या दृष्टीने मालवण पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांनी स्वखर्चातून साकव उभारून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. या साकवामुळे ग्रामस्थांची ये-जा अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
तोंडवळी मुंजाचे बाग येथे गणेश तोंडवळकर यांनी स्वखर्चातून साकवाचे बांधकाम पूर्ण केले. या साकवाचा लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेश तोंडवळकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

गावातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे, हीच खरी सामाजिक सेवा आहे. याच भावनेतून गणेश तोंडवळकर यांनी स्व खर्चातून साकव उभारला, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या परिसरातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून पुढाकार घेण्याचे त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
साकवाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी गणेश तोंडवळकर यांचे विशेष आभार मानत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला.

लोकप्रतिनिधित्वासोबतच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून स्वखर्चातून केलेले हे कार्य समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे दर्शन घडवणारे आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

तोंडवळी मुंजाचे बाग येथील साकवामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गरज ओळखून स्वतः पुढाकार घेत सुविधा निर्माण करणाऱ्या गणेश तोंडवळकर यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना जनतेची सेवा, विभागाचा विकास हेच आपले धेय्य आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठया प्रमाणात विकासनिधी मतदार संघात प्राप्त होत आहे. गतिमान विकास सुरु आहे. या जनसेवेच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा यां भावानेतून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली साकव उभारणी केली आहे. जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी या निमित्ताने सांगितले.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top