Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी मुथूट फिनकॉर्पच्या दोघा कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी फेटाळला..

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी मुथूट फिनकॉर्पच्या दोघा कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी फेटाळला..

फिर्यादीच्या वतीने ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर-कुबल, ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड. पलाश चव्हाण यांनी विशेष सत्र न्यायालयात मांडली बाजू तर सरकारी पक्षातर्फे ॲड रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला

मालवण | प्रतिनिधी
 :- मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित मुथूट फिनकॉर्प कर्मचारी तन्मय पराडकर व स्नेहल आचरेकर याचा अटकपूर्व जामीन मे. जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी फेटाळला.

या प्रकरणी कोळंब गावच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर, कर्मचारी तन्मय मंगेश पराडकर, स्नेहल राजन आचरेकर तसेच एजंट हर्षदा रमाकांत आडकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायदा अंतर्गत विविध गुन्हे दाखल होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित आरोपी मुथूट फिनकॉर्प कर्मचारी स्नेहा जामसंडेकर व एजंट हर्षदा आडकर हिला अटक केली होती. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलिसांना अटकेचा अधिकार अबाधित ठेवून १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान संशयित मुथूट फिनकॉर्प कर्मचारी तन्मय पराडकर व स्नेहल आचरेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मे जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी आरोपी पक्षाचा जामीन फेटाळून लावला. याकामी सरकार पक्षातर्फे ॲड रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर कुबल ,ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड. पलाश चव्हाण, ॲड.विवेक कुमार निषाद यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोन संशयित आरोपीं तन्मय पराडकर व स्नेहल आचरेकर यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोन्याचे दागिने तारण ठेवून सुमारे 120 पेक्षा अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

ruchira top