Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

'महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान..

'महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान..

मालवण तहसीलदार कार्यालयात १ ऑक्टोबरला आयोजन ; प्रलंबित महसुली प्रकरणे, वाद व प्रकरणांचा त्वरित व गतिमान निपटारा करण्यासाठी आयोजन

मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मालवण तालुक्यात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व प्रकरणांचा त्वरित व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार कार्यालय, मालवण यांच्या वतीने जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत तहसीलदार मालवण तसेच सर्व मंडळ अधिकारी यांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतिमान पद्धतीने निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणांतील वादी, प्रतिवादी, अपिलार्थी तसेच गैरअपिलार्थी यांना नोटीस देऊन प्रकरणे प्राधान्यक्रमाने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अभियानांतर्गत तहसीलदार मालवण यांच्या न्यायालयातील चालू दावे, अधिकार अभिलेख व कुळकायद्याशी संबंधित प्रकरणे, तसेच मंडळ अधिकारी स्तरावरील सुनावणी सुरू असलेल्या तक्रारींची फेरफार नोंद आदी प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबरला तहसीलदार कार्यालयात सुनावणी

तहसीलदार कार्यालय, मालवण येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या न्यायालयातील संबंधित प्रलंबित महसुली प्रकरणांचा या वेळी तडजोडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंडळ अधिकारी कार्यालये मालवण, आंबेरी, पेंडूर, श्रावण, पोईप, सुकळवाड, आचरे, कोळंब आणि मसुरे येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

संबंधित नागरिकांना आवाहन

मालवण तालुक्यातील सर्व संबंधित हितसंबंधित पक्षकार, अर्जदार व नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी संबंधित तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी विहित कालावधीत संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार मालवण गणेश लव्हे यांनी केले आहे.

प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून नागरिकांना दिलासा देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे संबंधितांनी या विशेष अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ruchira top