Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

गाबीत समाजाचा २० रोजी वधू - वर परिचय मेळावा..

गाबीत समाजाचा २० रोजी वधू - वर परिचय मेळावा..

मालवण | प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य वधू-वर मिळून त्यांचे विवाह होण्यास चालना मिळावी, तसेच समाजातील विवाह इच्छुक कुटुंबांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने विनामूल्य वधू-वर परिचय मेळावा दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या सभागृहात मेळावा आयोजित केला आहे.

सदर मेळावा हा पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचा असून गाबीत समाजातील विवाहयोग्य युवक-युवती व त्यांच्या पालकांच्या हितासाठी आयोजित करण्यात येत आहे. सुयोग्य स्थळासाठी गाव आणि शहर यांच्यात सन्मवय साधण्यासाठी गणेशोत्सवात गावात आलेल्या आणि गावातील विवाहोत्सुकांचा एक कार्यक्रम आयोजित करावा हा उद्देश आहे. या वधू वर परिचय मेळाव्यास गाबीत समाजातील जास्तीत जास्त युवक युवतीनी पालकांसमवेत आणि आपल्या संपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे, नोंदणी करण्यासाठी जन्मटिपण, फोटो, संपूर्ण माहितीसह व्हाटस्अपला सादर करावी किंवा वा प्रत्यक्ष भेटीत सादर करावी.

अधिक माहितीसाठी सुरेश बापर्डेकर-9869132882, बाळू वस्त-9371217606, राजरूप केळुसकर-9404750204, रघुनाथ जुवाटकर- 9421147437, शशांक कुमठेकर-9765766557 यांच्याशी संपर्क साधावा आवाहन असे आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ruchira top