Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको..

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको..

दर्जेदार काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला रुग्णालयाच्या बांधकामाचा मंत्रालयात आढावा

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सर्व संबंधित विभागांनी आणि कंत्राटदारांनी समन्वय ठेवून निर्धारित मुदतीत काम पूर्ण करावे, तसेच बांधकामाचा दर्जा उत्तम राखावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकाम प्रकल्पाचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची तसेच आतापर्यंत झालेल्या कामातील विलंबाच्या कारणांची सविस्तर माहिती घेण्यात आली.

प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून बांधकामाला वेग देण्याच्या कडक सूचना संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना देण्यात आल्या. कामाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या पातळीवर समन्वय साधण्याचेही निर्देश देण्यात आले.

सिंधुदुर्गातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जाईल, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पामुळे भविष्यात नागरिकांना मोठ्या क्षमतेचे आणि आधुनिक उपचारांचे केंद्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बांधकामाचा वेग आणि दर्जा या दोन्ही बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ruchira top