Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सुरेश बापर्डेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती..

सुरेश बापर्डेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती..

राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संगठनकडून नियुक्तीचे नूतनीकरण

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील तारकर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखाजी बापर्डेकर यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संगठनच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेने नियुक्तीपत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे नूतनीकरण केले असून, त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०२८ असा राहणार आहे.

संस्थेच्या नियुक्तीपत्रानुसार, सुरेश बापर्डेकर यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेला संवाद तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. व्यंकटेश महादेव अटक यांच्या शिफारशी आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, जनकल्याणकारी उपक्रम तसेच संस्थेने मंजूर केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी बापर्डेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिस्त, आचारसंहिता आणि कार्यपद्धतीचे पालन करून संघभावनेने कार्य करण्याचे आवाहन नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे.

वंचित, दुर्लक्षित तसेच ज्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचत नाही, अशा घटकांसाठी कार्य करणे हा संस्थेचा उद्देश असल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी बापर्डेकर यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

सुरेश बापर्डेकर यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, गावातील विविध मंडळे, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जनकल्याणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे बापर्डेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top