मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी: मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून अमित खोत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली.
मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत गणेश मूर्ती व सजावट स्पर्धा मालवण तालूका पत्रकार समिती सदस्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
सहभागी स्पर्धकांमधून विजेता स्वरूपात पाच स्पर्धाकांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धाकांनी आपली नाव नोंदणी मालवण तालुका पत्रकार समिती ग्रुपवर तसेच अमित खोत यांच्याकडे 21 सप्टेंबर या अंतिम तारीख पर्यंत द्यावीत.
गणपती मूर्ती व सजावट फोटो व व्हिडिओ स्पर्धा प्रमुख अमित खोत यांच्या मोबाईल : 9404457788 // 9284620263 या नंबरवर सर्व सहभागी स्पर्धाकांनी पाठवावेत.
मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी पदाधिकारी व स्पर्धा प्रमुख परीक्षण अंती सर्वानुमते विजेते निश्चित करणार आहेत. तरी सर्व समिती सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धा
