Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तऐवजीकरण..

महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तऐवजीकरण..

‘Bappa.org’ मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग :
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाशी घट्ट जोडलेला गणेशोत्सव राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यासाठी bappa.org हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या उपक्रमात केवळ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचीच नव्हे, तर घराघरातील गणेशोत्सवाचीही नोंद केली जाणार आहे. पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या घरगुती गणपतींच्या परंपरा, कुटुंबाची सजावट, स्थानिक लोककला, गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना या डिजिटल संग्रहात स्थान मिळणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार आणि विविध हस्तकला कारागिरांच्या कलेचीही नोंद केली जाणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना कोणतेही स्वतंत्र ॲप डाऊनलोड करण्याची किंवा क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचा एक चांगल्या दर्जाचा फोटो आणि त्यासोबत गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या दोन ते चार ओळी bappa.org या मंचावर पाठविता येतील.

मंचावर प्राप्त झालेल्या माहितीची संबंधित तज्ज्ञ समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित योगदानकर्त्याच्या नावासह अधिकृत नोंद क्रमांक देण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरांची अधिकृत आणि कायमस्वरूपी डिजिटल नोंद तयार होणार आहे. हा संग्रह भावी पिढ्यांसाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.

नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला कारागिरांनी आपल्या परिसरातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती bappa.org या अधिकृत मंचावर नोंदवावी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ruchira top