सुरू असलेल्या कामांचा घेतला आढावा
मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात सुरू असलेल्या विविध कामांची नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामांची माहिती घेत प्रशासनाकडून कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये आवश्यक कामे सुरू आहेत. या कामांची नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी पाहणी करून संबंधित प्रशासनाकडून माहिती घेतली. यावेळी शहरातील रस्ता मार्गांवरील झाडी कटाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गणपती विसर्जन मार्गांवरील व्यवस्था तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या अन्य कामांची पाहणी करण्यात आली. पुर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सव काळात शहरातील स्वच्छता, रस्ते तसेच विसर्जन मार्गांवरील आवश्यक सुविधा सुरळीत राहाव्यात, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी कामांच्या प्रगतीची माहिती घेतली.
फोटो : अमित खोत, मालवण

