Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिवसेना एक्सप्रेस कोकणात रवाना!

शिवसेना एक्सप्रेस कोकणात रवाना!

आमदार निलेश राणे यांचा सालाबादप्रमाणे विशेष रेल्वेगाडीचा उपक्रम

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा मोफत व सुखकर प्रवास

मोठया संख्येने उपस्थित कोकणकर प्रवासीवर्गाने व्यक्त केले आभार

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास मोफत व सुरक्षित व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी आमदार निलेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही विशेष रेल्वेगाडी दादर येथून कुडाळ कोकणच्या दिशेने रवाना केली. यावेळी कोकणवासीय प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.


गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे व बसगाड्यांना मोठी गर्दी होते. चाकरमान्यांना मोठी धावपळ करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षी ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेसेवेचे आयोजन करण्यात येते. यंदाही कोकणातील गणेशभक्तांना आपल्या गावी सुरक्षित आणि मोफत प्रवास करता यावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


मुंबईतून कोकणाच्या दिशेने रवाना झालेल्या ‘शिवसेना एक्सप्रेस’ला कोकणवासीय प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी घेण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून आला.

शिवसेना एक्सप्रेस’च्या रवाना प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोकणवासीय नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ हा दिलासा देणारा उपक्रम ठरला आहे.


चाकरमान्यांसाठी दिलासा

गणेशोत्सव हा कोकणातील नागरिकांसाठी भावनिक आणि श्रद्धेचा सण आहे. या काळात मुंबईसह विविध शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कोकणकर आपल्या गावाकडे परततात. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवाशांची संख्या, प्रवासखर्च यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना एक्सप्रेस’ हा उपक्रम चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कुटुंबांचा प्रवासाचा आर्थिक भार कमी झाला आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाण्याची इच्छा असलेल्या चाकरमान्यांना या उपक्रमामुळे सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळत आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांना भेटून प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले. मुंबईतील कोकणवासीयांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमान्यांसाठी करण्यात येणारी ही विशेष व्यवस्था कौतुकास्पद असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top