मालवण | प्रतिनिधी: क्रीडा संकुल, ओरोस येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सोहम सुर्वे याने इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून सहभागी होत प्रथम क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर अनिमेष कांदळगावकर याने इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेतून सहभागी होत जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

किक बॉक्सिंगमध्ये भंडारी कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी
