Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कर्जाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

कर्जाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक


राधानगरी येथील आणखी एक संशयित अटक : मालवण न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी


मालवण ||प्रतिनिधी : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवित मालवण येथील भारती धारकर यांची तब्बल ५१ लाख ८९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी सचिन गणपत साबळे (५०, राहणार कुरुकली कोल्हापूर तालुका राधानगरी) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण येथील न्यायालयात हजर केले असता, मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड उज्वला जाधव यांनी बाजू मांडली व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड तारिका चिंदरकर कुबल यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. सुनावणीअंती तपासकामत संशयितांची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करीत आहेत. यावेळी मालवण न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने मालवण व इतर ठिकाणांहून फसवणूक ग्रस्त नागरिक उपस्थित होते.


मुख्य संशयित आरोपी शुभम देशमुखसह महमुना शेख, प्रियांका खबडे, राहुल खबडे, उमेश कांबळे, सुरेखा पाटील, आनंद माने, सचिन साबळे, सुरेश पाटील, महेश शिंदे आणि रेणुका वड या १० साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अन्य संशयित यांचा शोध सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

ruchira top