विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तीन गटांत विजेत्यांची निवड
मालवण | प्रतिनिधी : दि म्युनिसिपल युनियन, मुंबईचे सहसचिव सचिन कृष्णाजी राणे यांच्या संकल्पनेतून तळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ येथे विद्यार्थ्यांसाठी श्रीगणेश चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ९ सप्टेंबr रोजी झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धा इयत्ता पहिली-दुसरी, तिसरी-चौथी आणि पाचवी अशा तीन गटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या विविध कलात्मक रूपांचे चित्र रेखाटत आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा सुरेख आविष्कार केला.
स्पर्धेचा निकाल -
गट १ – इयत्ता पहिली व दुसरी
प्रथम – कु. लावण्या ललित दळवी, द्वितीय – कु. मानस किशोर गावडे.
गट २ – इयत्ता तिसरी व चौथी
प्रथम – कु. कृष्णा शेखर तळगावकर, द्वितीय – कु. सान्वी राजेंद्र दळवी.
गट ३ – इयत्ता पाचवी
प्रथम – कु. तनिष चुडाजी तुळसुलकर, द्वितीय – कु. सुजय राजेंद्र दळवी.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. विजेत्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री गोविंद वाडकर तसेच सहशिक्षिका वेदिका वैभव वाघाटे यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून मुंबई येथील चित्रकला शिक्षक साईश कृष्णा नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांसाठीची बक्षिसे सचिन कृष्णाजी राणे यांनी प्रायोजित केली आहेत. १७ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
फोटो : चित्रकला स्पर्धेत सहभागी विध्यार्थी. (अमित खोत, मालवण)

