देवस्थानच्या विविध विषयांसह न्यास नोंदणी व देवकार्याच्या नियोजनावर होणार चर्चा
नांदरुख, कातवड व कर्लाचाव्हाळ येथील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : नांदरुख येथील श्री देव गिरोबा देवस्थानाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी ग्रामस्थांची विशेष सभा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री देव गिरोबा मंदिर, नांदरुख येथे आयोजित करण्यात आली आहे. अखिल नांदरुख ग्रामस्थ तसेच देवस्थान समिती, नांदरुख यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदरुख, कातवड व कर्लाचाव्हाळ परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या सभेला उपस्थित राहून देवस्थानच्या कामकाजाबाबत आपले मत मांडावे, तसेच चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. देवस्थानशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.
सभेच्या अजेंड्यामध्ये मागील १७ मे २०२६ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देणे, तसेच देवस्थानची वार्षिक देवकार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन व त्यासंदर्भातील चर्चा करण्यात येणार आहे.
याशिवाय देवस्थानच्या न्यास नोंदणीबाबत आतापर्यंत झालेल्या घडामोडींवर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दाखल न्यास नोंदणी अर्जातील काही विश्वस्तांनी दिलेल्या राजीनाम्यांना मंजुरी देण्याबाबतही सभेत निर्णय घेतला जाणार आहे. न्यासामध्ये नवीन विश्वस्तांचा समावेश करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत चर्चा व निर्णय, हा देखील सभेतील महत्त्वाचा विषय आहे. यासोबतच अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या इतर विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
धर्मादाय विभागाच्या विश्वस्तांची उपस्थिती अनिवार्य
उप धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग विभाग यांच्याकडे सादर असलेल्या न्यास नोंदणी समितीतील सर्व विश्वस्तांनी या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यास नोंदणी प्रक्रियेशी संबंधित बाबींवरही या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
देवस्थानशी संबंधित विविध महत्त्वाचे विषय सभेसमोर ठेवण्यात येणार असल्याने नांदरुख, कातवड व कर्लीचाळ येथील सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून चर्चेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभेची माहिती सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी परिचयातील इतर ग्रामस्थांनाही सभेची माहिती देऊन त्यांना उपस्थित राहण्यासाठी सूचित करावे, अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.
ग्रामस्थांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची
देवस्थानशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवस्थानच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समिती, नांदरुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर येथे १७ सप्टेंबरला ग्रामस्थांची सभा..
