Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराची क्रांती शक्य!

जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराची क्रांती शक्य!


गोव्या पेक्षा महाराष्ट्रासाठी मोठी संधी

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट

कणलावली :  सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला चालना देण्यासह जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान जहाजबांधणी, दुरुस्ती, डाय डॉक तसेच या क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या विविध रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासमोर शिपयार्डमधील कामकाजाचे सादरीकरण केले. परदेशातून आलेल्या जहाजांची सुरू असलेली दुरुस्ती, डाय डॉकची सुविधा, जहाजबांधणीची प्रक्रिया आणि या उद्योगाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी माहिती दिली.

“जहाजबांधणी उद्योग महाराष्ट्र आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराची मोठी क्रांती घडवू शकतो. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविणारा हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो. गोव्यापेक्षाही या उद्योगासाठी महाराष्ट्राकडे मोठी क्षमता आणि संधी आहे,” असे मत प्रियेश कामत यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्गाला विस्तीर्ण समुद्रकिनारा, बंदरे आणि जलवाहतुकीची मोठी क्षमता लाभली आहे. त्यामुळे जहाजबांधणी व दुरुस्ती उद्योगाला चालना मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळू शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत, प्रशांत देसाई,उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, बाबू नाईक आणि साईल देसाई उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, रुपेश कानडे, डॉक्टर अमोल तेली आधी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी या दौऱ्यात सहभाग घेत या प्रकल्पाची पाहणी केली.

ruchira top