Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा

पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा

‘माझी वसुंधरा’ अभियान व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत मालवण नगरपरिषदचे आयोजन

प्लास्टिकला नकार पर्यावरणाचा स्वीकार ; हरित गणेशोत्सव हरित मालवण

मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. घरगुती गणेश सजावट गटासाठी आयोजित या स्पर्धेत मालवण नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचा उद्देश पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर तसेच जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे हा आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरांत आकर्षक सजावट केली जाते. मात्र या सजावटीसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणाला हानिकारक साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याला पर्याय म्हणून बांबू, कागद, कापड, लाकूड, माती, नैसर्गिक फुले, पाने तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून सजावट करण्यास या स्पर्धेत प्राधान्य देण्यात आले आहे.


पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य

स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. प्लास्टिक, थर्माकोल आणि पर्यावरणास हानिकारक साहित्याचा वापर टाळणे, नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर वाढविणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन व शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे, तसेच जलसंधारण, ऊर्जा बचत आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणे, या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

याशिवाय घर व परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्याबरोबरच ‘माझी वसुंधरा – माझी जबाबदारी, स्वच्छ मालवण – आपली सर्वांची तयारी!’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

१०० गुणांचे परीक्षण

स्पर्धेचे परीक्षण एकूण १०० गुणांच्या निकषांवर करण्यात येणार आहे. त्यामध्ये पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरासाठी सर्वाधिक २० गुण, कल्पकता व नाविन्यासाठी १५ गुण, तर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावटीसाठी १० गुण देण्यात येणार आहेत.
तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, ‘माझी वसुंधरा अभियान’चा संदेश, स्वच्छ सर्वेक्षण व कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, जल-ऊर्जा-वृक्ष संवर्धन आणि परिसर स्वच्छता या बाबींनाही गुण देण्यात येणार आहेत. एकूण सादरीकरणासाठी १० गुण राखीव आहेत.

घरगुती गणेश सजावट गट

ही स्पर्धा घरगुती गणेश सजावट गटासाठी असून त्यासाठी मालवण नगरपरिषद हद्द ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. गणेशमूर्ती व सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणे, पाणी व विजेचा अनावश्यक वापर टाळणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, या प्रमुख अटी ठेवण्यात आल्या आहेत.
परीक्षक समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार असून निश्चित केलेल्या वेळेत सजावट पूर्ण असणे आवश्यक आहे.

विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकास ७,५०० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ५,००० रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास २,५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
याशिवाय उत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट, उत्कृष्ट पुनर्वापर सजावट, उत्कृष्ट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, उत्कृष्ट पर्यावरण जनजागृती संदेश आणि उत्कृष्ट नैसर्गिक सजावट अशा विविध बाबींमध्ये विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.

१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ असून अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरून सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासाठी क्यूआर कोडची सुविधाही जाहिरातीत देण्यात आली आहे.

मालवण शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजविण्यासोबतच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहासोबतच पर्यावरणाची जबाबदारी जपण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार असून, ‘प्लास्टिकला नकार, पर्यावरणाचा स्वीकार’ या भूमिकेतून जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेने केले आहे.

या उपक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top