Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे प्रौढ साक्षरता दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे प्रौढ साक्षरता दिन साजरा

प्रत्येक प्रौढ साक्षर नागरिक म्हणजे विकसित भारताची पायरी

आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे ही उपस्थितांना मार्गदर्शन

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रौढ साक्षरता दिवस प्रौढांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा जागतिक उत्सव आहे. साक्षरता व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवते. जीवनमान उंचावते आणि समाज प्रगतीपथावर नेते. प्रत्येक प्रौढ साक्षर नागरिक म्हणजे विकसित भारताची पायरी आहे.असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी ‘आहाराचे महत्त्व आणि योग्य आहार’ या विषयावर उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


लायन्स क्लब ऑफ मालवणची सप्टेंबर महिन्यातील जनरल मीटिंग यावेळी पार पडली. बैठकीच्या प्रारंभी विद्यमान सेक्रेटरी पूनम चव्हाण यांच्या मातोश्री कै. सरोज परब यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


प्रौढ साक्षरता दिनानिमित्त क्लबच्या वतीने सर्क्युलर प्रकाशित करण्यात आले. यावेळी डॉ. गार्गी ओरसकर यांनी दैनंदिन जीवनात संतुलित व सकस आहाराचे महत्त्व, योग्य आहाराची निवड तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते डॉ. गार्गी ओरसकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकदास, जयश्री हडकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शरबिद्रे, मनाली दळवी, मीना घुर्ये, रूपा कांदळगावकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top