५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक
विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व
मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी ओरोस येथील क्रीडा संकुल जलतरण तलावात १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील ५० मीटर बॅकस्ट्रोक या जलतरण प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील जतीन संतोष करंगुटकर याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो आता विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जतीनने मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण जी. ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्तरावरील पुढील वाटचालीसाठी जतीनला शुभेच्छा दिल्या.
▪️अमित खोत | मालवण

रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाच्या जतीन करंगुटकरची विभाग स्तरावर निवड
