Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करा!

हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करा!

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाने खोट्या अफवा पसरवू नयेत

युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके

सिंधुदुर्ग : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आणि अफवा प्रसारित केल्या जात आहेत. मात्र,*या दाव्यात कोणतेही तथ्य नसून डॉ. श्रीपाद पाटील यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिलेला आहे.*

उबाठा गटाकडून जर या राजीनाम्याबाबत एवढेच खात्रीशीर दावे केले जात असतील, तर हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करावी! केवळ राजकीय हेतूने अर्धवट माहितीच्या आधारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

अनधिकृत बांधकामावरील झालेली कारवाई ही अचानक किंवा कोणाच्या दबावामुळे झालेली नसून, अनेक महिन्यांपासून प्रस्तावित असलेली कारवाई आहे. संबंधित सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच शासनाकडून नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कारवाईचा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याशी संबंध जोडणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांनी प्रथम जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याबाबत नीट माहिती घ्यावी आणि त्यानंतरच आरोप करावेत. वस्तुस्थिती अशी आहे की, डॉ. श्रीपाद पाटील अजूनही जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असून जिल्हा रुग्णालयात आपली सेवा देत राहणार आहेत.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या जागेत अनधिकृत हॉटेल उभारून दरमहा ४० हजार रुपये भाडे वसूल करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांचे प्रकार आरोग्य विभागाच्या कारवाईमुळे उघड्यावर आले आहेत. त्यामुळे कारवाईनंतर निर्माण झालेल्या नैराश्यातूनच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याबाबत अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

कारवाई कायदेशीर प्रक्रियेतून झाली आहे; राजीनामा व्यक्तिगत कारणास्तव झाला आहे. त्यामुळे खोट्या अफवा आणि राजकीय अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न उबाठा गटाने थांबवावा.

अफवांच्या राजकारणापेक्षा कागदपत्रे समोर ठेवा — हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करा

स्वरूप वाळके
युवासेना जिल्हाप्रमुख

ruchira top