Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

आचरा-भगवंतगड 'तर' पर्यंत येणारी एसटी गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करा

आचरा-भगवंतगड 'तर' पर्यंत येणारी एसटी गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करा

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेधले एसटी प्रशासनाचे लक्ष

एसटी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : आचरा-भगवंतगड तर पर्यंत येणारी एसटी बससेवा गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी सुरू करावी, या ग्रामस्थ व प्रवासी यांच्या मागणीची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत एसटी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.

आचरा-भगवंतगड मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थ, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गणेश चतुर्थीचा सण जवळ आल्याने प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामस्थ व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन दत्ता सामंत यांनी एसटी प्रशासनाशी संपर्क साधत गणेश चतुर्थीपूर्वी आचरा-भगवंतगडपर्यंत एसटी सेवा सुरू करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

या मागणीला एसटी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लवकरच या मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ruchira top