Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

वीज व स्ट्रीट लाईट समस्या तातडीने दूर करा

वीज व स्ट्रीट लाईट समस्या तातडीने दूर करा


बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व नगरसेविका अश्विनी कांदळकर यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : शहरातील वीज तसेच स्ट्रीट लाईटच्या ज्या ज्या तक्रारी आहेत, समस्या आहेत त्या तातडीने दूर करा. असे सांगत मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात वीज अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी अनिल कांदळकर हेही उपस्थित होते. नागरिकांना तत्पर सेवा मिळाली पाहिजे यां दृष्टीने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. असेही सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

मेढा कुंभार गल्ली कोतेवाडा परिसरातील स्ट्रीट लाईटची समस्या दूर करण्यासाठी फेज टाकून देण्याची ही मागणी नगरपरिषद स्तरावरून करण्यात आली आहे. या कामाबाबतची पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. यांसह परिसरातील अन्य वीज समस्या प्राध्यानाने सोडवव्यात. वीज खांब तसेच वीज वाहिनी यावर मोठया प्रमाणात झाडी वेली वाढल्या आहेत. त्यामुळे विज समस्या निर्माण होत आहेत. त्याबाबतही तातडीने कार्यवाही व्हावी असेही यावेळी सांगण्यात आले.

वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, स्ट्रीट लाईटच्या समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य वीजविषयक प्रश्नांबाबतही यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेषतः रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरळीत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.वीज वितरण विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ruchira top