वेंगुर्ला | प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारासाठी प्राजक्ता आपटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपा च्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली प्रभावी भूमिका आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती असल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी नमूद केले.
पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपटे मॅडम यांचे अभिनंदन केले. तसेच, भविष्यातही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,नगरसेविका गौरी मराठे,नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेवक रविंद्र शिरसाठ,वेताळ प्रतिष्ठान चे डॉ. सचिन परुळकर, प्रा. सदाशिव सणगर, संजय पुनाळेकर, दिनेश तानावडे आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्राजक्ता आपटे यांचा शिक्षकदिनी भाजपा घ्या वतीने सन्मान
